जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा बंद ; आयएमएने शासनाला दिले निवेदन

बातमी शेअर करा...

जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा बंद ; आयएमएने शासनाला दिले निवेदन

जळगाव – रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शासनाच्या निर्णया विरोधात आयएमएतर्फे राज्यव्यापी वैद्यकीय सेवाबंद आंदोलन करण्यात आले व त्याविषयी शासनासाठी निवासी जिल्हाधिकारी जयश्री माळी यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने ५ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचने विरोधात सर्व डॉक्टरांनी गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून नियमित व आपत्कालीन वैद्यकीय सेवा बंद ठेवीत या आंदोलनात सहभाग घेतला.
प्रारंभी आयएमए जळगावच्या सभागृहात सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत या शासन निर्णय व आंदोलनाला संदर्भात भूमिका स्पष्ट केली. त्यात अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ.भरत बोरोले, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ.विलास भोळे, डॉ.सुनील गाजरे यांनी विचार व्यक्त केले.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन आयएमएतर्फे निवासी जिल्हाधिकारी जयश्री माळी यांना निवेदन देण्यात आले.
भविष्यात रुग्णांच्या आरोग्याला होणारा गंभीर धोका टाळण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्राची शुद्धता टिकवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून शासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास आगामी काळात बेमुदत वैद्यकीय सेवा बंद आंदोलन करण्यात येईल असा आयएमएने इशारा दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम