जिल्ह्यातील ९ तालुक्यांना देणार भगवान परशुरामांची मूर्ती

बहुभाषिक ब्राह्मण संघाकडून परशूराम जन्मोत्सवाची तयारी सुरु

बातमी शेअर करा...

जिल्ह्यातील ९ तालुक्यांना देणार भगवान परशुरामांची मूर्ती

बहुभाषिक ब्राह्मण संघाकडून परशूराम जन्मोत्सवाची तयारी सुरु

जळगाव : शहरासह जिल्हाभरात देखील परशूराम जन्मोत्सव साजरा व्हावा, या करीता या वर्षी ९ तालुक्यांना भगवान परशूरामांची कायमस्वरुपी मुर्ती देवून तेथे देखील भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. तसेच दि. शहरात देखील भगवान परशूराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती श्रीकांत खटोड यांनी दिली.

शहरात भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. जिल्हाभरात देखील परशुराम जन्मोत्सव साजरे व्हावे म्हणुन यंदा ९ तालुक्यांना भगवान परशुरामांची मुर्ती देण्यात येऊन तेथे देखील भव्य शोभायात्रेतचे आयोजन केले जाणार आहे. यंदा जन्मोत्सवात दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता स्व बलदेव उपाध्याय फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर, त्यानंतर तालुक्यांना भगवान परशुराम मूर्ती वितरण, सायंकाळी पाच वाजता महाबळ चौकातुन विराट मोटर सायकल रॅली तर सायंकाळी ७ वाजता

परशुराम दूत व देणगीदाते गौरवचे आयोजन देखील पोलिस मल्टी पर्पज हॉल याठिकाणी करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला विद्यमान अध्यक्ष नितीन पारगावकर, सचिव राजेश नाईक, पंकज पवनीकर व महिला संघाच्या अध्यक्षा वृंदा भालेराव, शरद पांडे व मनीष पात्रीकर उपस्थित होते.

राम मंदिरात पूजन होवून निघणार शोभायात्रा

दि. २९ एप्रिल रोजी दुपारी राम मंदिरात पुजन होऊन दुपारी साडेचार वाजता भव्य दिव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत समस्त ब्राह्मण समाजबांधव सहभागी होणार आहे. त्यानंतर दि. ४ मे रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव व जगद्‌गुरु आदी शंकराचार्य जयंती निमित्त सुशील देवधर यांचे व्याख्यानाचे देखील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आले असल्याने जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे देखील आवाहन यावेळी करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम