
जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ५ वर्षांत ५ हजार रुग्ण
जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ५ वर्षांत ५ हजार रुग्ण
३.४० टक्के बालकांचा समावेश; वेळेत उपचार घेतल्यास १०० टक्के बरे होतो
जळगाव : एप्रिल महिन्यात राज्यात १४ हजारांहून अधिक नवीन कुष्ठरुग्ण आढळले असून त्यात ३.४० टक्के बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षांत ५२२३ रुग्ण आढळले. यापैकी ४९९७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
‘एमडीटी’ या उपचार पद्धतीने कुष्ठरोग १०० टक्के बरा होतो, मात्र यासाठी वेळेत आणि न चुकता औषधे घेणे आवश्यक आहे. विकृती असलेल्या रुग्णांना गोळ्यांबरोबर फिजिओथेरपी व शस्त्रक्रियाही मोफत पुरवल्या जातात. गावपातळीवर आशा कार्यकर्ती, आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे आणि सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत नियमित तपासणी केली जाते.
तसेच ‘स्पर्श अभियान’ आणि ‘कुष्ठमुक्त सुदृढ महाराष्ट्र’ या मोहिमांतून समाजात जनजागृती केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम