जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी १२१ उमेदवारांची माघार आज लढतीचे अंतिम चित्र होणार स्पष्ट

बातमी शेअर करा...

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी १२१ उमेदवारांची माघार
आज लढतीचे अंतिम चित्र होणार स्पष्ट

जळगाव – नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी दुसऱ्या दिवशी तब्बल १२१ जणांनी माघार घेतल्याने अनेक ठिकाणच्या लढतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. विशेष म्हणजे जामनेर येथे नगराध्यक्षपदाच्या चार उमेदवारांपैकी तिघांनी माघार घेतल्याने नगराध्यक्ष निवड बिनविरोध होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांमध्येही माघारीची लाट दिसून आली असून आजचा दिवस माघारीसाठीचा शेवटचा टप्पा असल्याने चर्चा, समझोते आणि दबावाचे राजकारण दिवसभर तापण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांत सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये धरणगाव येथे सर्वाधिक २६ जणांनी माघार घेतली असून अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ, यावल, पारोळा, भडगाव, नशिराबाद, चोपडा, वरणगाव, पाचोरा, सावदा, रावेर, एरंडोल, फैजपूर, शेंदुर्णी व मुक्ताईनगर येथेही अनेक उमेदवारांनी नामनिर्देशन मागे घेतले आहे.
२१ नोव्हेंबर हा माघारीचा अंतिम दिवस असल्याने उमेदवार बदलण्याची परिस्थिती आज स्पष्ट होणार आहे.

२० नोव्हेंबरला झालेली माघार – संक्षिप्त स्थिती
भुसावळ – नगरसेवक १३
अमळनेर – ११
चाळीसगाव – ११
चोपडा – ०३
जामनेर – नगरसेवक १३, नगराध्यक्ष ०३
पाचोरा – ०१
यावल – ०६
नशिराबाद – नगरसेवक ०६, नगराध्यक्ष ०१
वरणगाव – ०१
पारोळा – ०७
भडगाव – नगरसेवक ०६, नगराध्यक्ष ०१
धरणगाव – २६
सावदा – ०१
रावेर – ०४
एरंडोल – ००
फैजपूर – नगरसेवक ०३, नगराध्यक्ष ०१
शेंदुर्णी – ०१
मुक्ताईनगर – ००

एकूण माघारी:
नगरसेवक – ११३
नगराध्यक्ष – ०८

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम