जिल्ह्यात १६ नगरपरिषदा, २ नगरपंचायतींसाठी आज मतदान

बातमी शेअर करा...

जिल्ह्यात १६ नगरपरिषदा, २ नगरपंचायतींसाठी आज मतदान

जळगाव : जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज दि. २ रोजी मतदान होत आहे. गेल्या महिनाभरापासून तापलेल्या प्रचाराचे पडघम थंडावले असून आता मतदार आपला कौल नोंदवण्यासाठी मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरूवात होईल तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

या निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या जोमाने प्रचार केला. घराघर संपर्क, पदयात्रा, लहान-मोठ्या सभा, रॅली, सोशल मीडियावर प्रचार अशा सर्व मार्गाचा वापर करून उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

निवडणूक आयोगाने प्रचाराची मुदत

१ डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत दिली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशीही उमेदवारांनी पूर्ण ताकदीने प्रचार केला. प्रत्येक प्रभागात प्रचाराची धग जाणवत होती. जिल्हयात ४६४ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. त्याअनुषंगाने यापूर्वी ९७७ मतदान केंद्र होते. मात्र, जामनेर नगरपरिषदेतील तीन प्रभाग बिनविरोध झालेले आहेत. त्यामुळे आता ९६७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्याठिकाणी मतदान पथके पोहचले आहेत. जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी १४८८, तर नगराध्यक्षपदासाठी ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

निवडणुकीत महिला मतदारांची संख्या उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील अनेक प्रभागांमध्ये पुरूष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. याशिवाययंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिला उमेदवारांची संख्याही जास्त आहे. अनेक ठिकाणी सर्वसाधारण जागेसाठी महिला उमेदवार निवडणुक रिंगणात असल्यामुळे महिला प्रचाराच्या केंद्रस्थानी होत्या. या निवडणुकीत केवळ उमेदवारांचेच भविष्य नाही, तर मंत्री, माजी मंत्री, स्थानिक आमदार, खासदार आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्ह्यात १२ जागांच्या निवडणुका

पुढे ढकलल्या

जिल्ह्यात नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाच्या नवीन आदेशाने जिल्ह्यात सहा नगर परिषदांमधील १२ जागाच्या

निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. या प्रभागांमध्ये पुन्हा ४ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानुसार आता २० डिसेंबर रोजी या १२ जागांसाठी निवडणूक तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अमळनेर नगरपरिषदेत प्रभाग १ अ, सावदा नगरपरिषेदत प्रभाग २ ब, प्रभाग ४ ब, व प्रभाग १० ब, यावल नगरपरिषदेत प्रभाग ८ ब, वरणगाव नगरपरिषेदत प्रभाग १० अव १० क, पाचोरा नगरपरिषदेत प्रभाग ११ अ व प्रभाग १२ ब, भुसावळ नगरपरिषदेत प्रभाग ४ ‘ब’, प्रभाग ५ ‘ब’ आणि प्रभाग ११ ‘ब’ या प्रभागांच्या निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम