जिल्ह्यात १८ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता

बातमी शेअर करा...

जिल्ह्यात १८ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता

गडगडाट, विजांसह वादळी वाऱ्यांचाही इशारा

जळगाव : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दि. १३ मेपासून १८ मेपर्यंत जळगाव जिल्ह्यात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस, गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वेदर वेलनेसने वर्तवली आहे.

दि. १३ आणि १४ मे रोजी दुपारनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, ३० ते ५० टक्के पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ३५ ते ४० किमी/तासापर्यंत जाण्याची शक्यता असून, विजांचा धोका देखील संभवतो.

तसेच, दि. १६ व १७ मे रोजी दुपारी किंवा सायंकाळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर, १८ ते १९ मे दरम्यान तापमानात लक्षणीय वाढ होऊन उष्णतेची तीव्रता ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाणवेल. या काळात वातावरण कोरडे राहील. मात्र, १८ मेनंतरही हवामान स्थिर राहण्याची शक्यता कमी असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असा हवामान विभागाचा इशारा आहे.

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी हवामानाच्या बदलत्या स्थितीकडे लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम