
जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटमध्ये एम्प्लॉई एनुअल स्पोर्ट अॅण्ड कल्चरल मिट उत्साहात
माइंडफुलनेस आणि विश्रांती-तणाव व्यवस्थापित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन
जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटमध्ये एम्प्लॉई एनुअल स्पोर्ट अॅण्ड कल्चरल मिट उत्साहात
माइंडफुलनेस आणि विश्रांती-तणाव व्यवस्थापित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव I प्रतिनिधी
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयामध्ये सहका-यांसाठी 17th एम्प्लॉई एनुअल स्पोर्ट अॅण्ड कल्चरल मिट म्हणजेच “नीव” हा वार्षिक आनंदोस्तव व क्रीडा सप्ताह जल्लोषात पार पडला.
यावेळी समूह गायन, समूह नृत्य, एकल नृत्य, व्यक्तिगत गायन, पारंपारिक वेशभूषा, बॉलिवूड थीम, फॅशन शो, काव्य वाचन, नाटक, मिमिक्री, क्रिकेट, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम, बॅटमिंटन, संगीत खुर्ची, रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
इस्टीट्यूटमधील सहका-यांना कामातून मोकळीक मिळावी तसेच कामाचा ताण कमी व्हावा आणि आपल्यातील विविध कलागुणांना चालना मिळावी, त्यांच्यातील कलाकार जिवंत राहावा व नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी या उद्देशाने क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल चार दिवस जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी, बिजनेस मॅनेजमेंट, कनिष्ठ महाविद्यालय व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील ३०० सहकाऱ्यांनी विविध कला प्रकारात सहभागी होऊन आयुष्याची नीव पुन्हा मजबूत केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी व आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर सहकाऱ्यामुळेच रायसोनी इस्टीट्यूट सदैव यशोमार्गावरून वाटचाल करत आहे असा विश्वास व्यक्त करत सहकारी आनंदात असतील तरच संस्थेचा विकास होईल.
अशा प्रकारचे कार्यक्रम एकमेकातील स्ट्रॉंग नेटवर्क, स्ट्रेस मॅनेजमेंट, माइंडफुलनेस व वेल बॉन्डिंग निर्माण करण्यासाठी मदत करतात तसेच माहिती तंत्रज्ञानाचा कामकाजात वापर सुरू असल्याने तत्परता, गती वाढली आहे, त्यासोबतच कर्मचाऱ्यांवर तणाव देखील वाढला आहे या अनुशंगाने क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव व वार्षिक सहली या अशा प्रकारच्या एकत्रीकरणातून प्राध्यापक-प्राध्यापकेत्तर सहका-यांचा तणाव कमी व्हावा व ‘खेळकर व तणाव मुक्त कर्मचारी’ ही रायसोनी इस्टीट्युटची ओळख बनावी, अशी अपेक्षा आमच्या समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांची असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी क्रिकेट – प्रा.जितेंद्र वडदकर, सागर सोनवणे, कॅरम – प्रा.सुवर्णा सराफ, प्रा.तुषार वाघ, बुद्धिबळ – प्रा.विशाल राणा, प्रा.निलेश इंगळे, संगीत खुर्ची – प्रा.डॉ.योगिता पाटील, प्रा.करिष्मा चौधरी, प्रा. डॉ.मुकेश अहिरराव, बॅडमिंटन – प्रा.पंकज रंगलानी, रस्सीखेच – आशा पाटील, गायन – अनिल सोनार, मिमिक्री, कविता/शायरी व फिशपॉन्ड – प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, प्रा. डॉ. स्वाती पाटील. नृत्य – प्रा. पूजा नवाल, प्रा. प्रियंका मल, फॅशन शो – प्रा.प्रिया टेकवानी, प्रा.प्राची जगवानी, प्रा.निकी वेद, किड्स डे,/ मिसमॅच डे /बॉलीवूड डे व कल्चरल डे – प्रा.मृदुला देशपांडे व प्रा.प्रिया टेकवानी, अँकरिंग – प्रा. रफिक शेख, प्रा. वसीम पटेल, प्रा. तन्मय भाले. प्रा. निखिल ठाकूर, फूड – प्रा. डॉ. शंतनू पवार, अजय चौधरी, शीतल जैन, एचआर आकाश राठोड, रजीस्टार अरुण पाटील, बक्षीस वितरण – प्रा.रुपाली ढाके, प्रा.शितल जाधव, स्टेज अँड एम्फी थिएटर व्यवस्था – प्रा. आरती पाटील, प्रा. प्रतीक्षा जैन, काशिनाथ सोनार आदींनी या कार्यक्रमाचे समन्वय साधले तसेच याप्रसंगी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व व्यवस्थापनाचे हा आनंदोस्तव आयोजित केल्याबद्दल आभार मानले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम