
जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न समपुदेशनाने सुटतात – अधिष्ठाता प्रा.डाॅ.एस.टी.भूकन
डॉ.बेंडाळे महाविद्यालयात समुपदेशन कार्यशाळा
जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न समपुदेशनाने सुटतात – अधिष्ठाता प्रा.डाॅ.एस.टी.भूकन
डॉ.बेंडाळे महाविद्यालयात समुपदेशन कार्यशाळा
जळगाव प्रतिनिधी ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभाग (पीएम-उषा ) आणि डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय एकदिवसीय ‘मुला- मुलींचे समुपदेशन कार्यशाळा’ संपन्न झाली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय प्राचार्य डॉ.व्ही.जे.पाटील हे होते.तर उद्घाटक म्हणून अधिष्ठाता आंतरविद्याशाखीय विद्याशाखा व सदस्य, विद्यापरिषद कबचौउमवि, जळगावचे प्रा.डॉ.साहेबराव भुकन होते.
कार्यशाळेस प्रमुखअतिथी म्हणून सहसंचालक, उच्च शिक्षण जळगाव विभाग,जळगावचे मा.डॉ.पराग मसराम हे उपस्थित होते.
सुरुवातीला कार्यशाळेचे समन्वयक डॉ.अशोक पाटील यांनी आयोजनाची भूमिका विशद केली. त्यानंतर कला व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे लिखित ‘महाविद्यालय गीत’ संगीत विभागाच्या प्रा. ऐश्वर्या परदेशी व विद्यार्थिनींनी सादर केले.
. कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते रंगीबेरंगी मेणबत्त्या प्रज्वलित करून त्यांचे प्रतीकात्मक अर्थ सांगून नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले.
आज आधुनिकीकरणात आपण जागतिक झालो आहोत आणि कौटुंबिक पातळीवर एकाकी झालो आहोत. त्यामुळे समुपदेशनाची गरज कधी नव्हे तर,आज निर्माण झाली आहे.तळहातावरच्या मोबाईलभोवती आमचे कौटुंबिक जीवन प्रदक्षिणा घालत आहे. त्यामुळेच आजचे तरुण-तरुणी भावनिक दृष्ट्या संस्कार मुक्त बनले आहेत ;हे होवू नये म्हणूनच ही समुपदेशन कार्यशाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात मा.डॉ. साहेबराव भुकन यांनी समुपदेशन जीवनात गरजेचे असून, समुपदेशनामुळे जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल,मानवी जीवन मूल्यांवर आरूढ असले पाहिजे तरच जीवनशैली संजीवन ठरते,असे विचार मांडून त्यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनानंतरच्या प्रथम सत्रात संसाधन व्यक्ती म्हणून मानसशास्त्रज्ञ डॉ.वीणा महाजन, कबचौउमवि यांनी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी विवाह, कुटुंबव्यवस्था, विवाह नंतरच्या समस्या, जोडीदाराशी असलेले नातेसंबंध, तसेच वैवाहिक आयुष्यातील सहजीवनाची सूत्रे त्यांनी सांगितले. यापुढे दुसऱ्या सत्रात स्त्रीरोगतज्ञ डॉ. सोनल इंगळे यांनी ‘आरोग्यशास्त्र व पौगंडावस्था’ या विषयावर समुपदेशन करताना किशोरवयातील मानसिक व शारीरिक बदल, विविध समस्या यावर सविस्तर चर्चा केली.
भोजनानंतरच्या दुपारच्या सत्रात जी.टी.पी.महाविद्यालय, नंदुरबार येथील डॉ. सतीश सुर्ये यांचे ‘व्यवसाय समुपदेशन’ या विषयावर सत्र संपन्न झाले. या सत्रात त्यांनी तरुण-तरुणींचे करिअर विषयक समुपदेशन केले.चौथ्या सत्रात नंदुरबार येथील प्रा.डॉ.एस.यु.अहिरे यांनी ‘मानसिक आरोग्य समुपदेशन’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.तसेच याप्रसंगी उपस्थितांचे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समस्या निराकरण करण्यात आले. यानंतर समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या पी.एम.उषाचे समन्वयक प्रा.डॉ.कीर्ती कमलजा उपस्थित होत्या.याप्रसंगी त्यांनी कार्यशाळेचे महत्व विद्यार्थिनींना पटवून दिले.
त्यानंतर प्राचार्य डॉ. व्ही. जे.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून समुपदेशन कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची असून, तरुण-तरुणींना या कार्यशाळेच्या माध्यमातून योग्य दिशा गवसेल व उज्वल भविष्य घडवण्यासाठी सदर कार्यशाळा फलदायी ठरेल असे मत मांडले. त्यानंतर दिवसभर चाललेल्या कार्यशाळेचा गोषवारा कार्यशाळा समन्वयक डॉ.अशोक पाटील यांनी मांडला. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनी कु.श्रुती मराठे आणि कु.सुवर्णा राणे यांनी प्रातिनिधिक मनोगतातून कार्यशाळा आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यशाळेत सहभागी 200 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करून कार्यशाळेचा समारोप झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.पी.एन.तायडे, कला व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. स्मिता चौधरी,श्री.अजय शिवरामे व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या विविध सत्राचे सूत्रसंचालन प्रा.दीपक पवार,प्रा. सुनील अहिरे आणि प्रा.नयना पाटील यांनी केले. तर यशस्वीतेसाठी डॉ. राणी त्रिपाठी, डॉ.विनोद नन्नवरे, डॉ. दीपक किनगे,डॉ.सचिन कुंभार, प्रा.योगिता सोनवणे, प्रा. निलेश कोळी, प्रा.शांताराम तायडे, प्रा.प्रियंका आठे, प्रा.मंगेश किनगे,प्रा. करण थोरात, प्रा.अमृता नेतकर प्रा. कल्पना खेडकर व शिक्षकेतर सहकारी यांचे कार्यशाळा यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम