
जी. एच. रायसोनीच्या “टेक्नोरीओन -२०२५” स्पर्धेतून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना कौशल्यवाढीचा बूस्टर
तांत्रिक कलांचा आविष्कार ; विविध महाविद्यालयातील ४९६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जी. एच. रायसोनीच्या “टेक्नोरीओन -२०२५” स्पर्धेतून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना कौशल्यवाढीचा बूस्टर
तांत्रिक कलांचा आविष्कार ; विविध महाविद्यालयातील ४९६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव ;- विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या “टेक्नोरीओन – २०२५” हा उपक्रम जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ता. २१ मार्च शुक्रवार रोजी या राष्ट्रीय स्तरावरील “टेक्नोरीओन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे स्वयंसंशोधीत नवनविन उपकरणांचे मॉडेल्स, प्रोजेक्ट एक्झिक्यूशन व रोबोटीक्स याचे प्रमुख आकर्षण होते.
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात दरवर्षाप्रमाणे यंदाही “टेक्नोरीओन” हा राष्ट्रीय इव्हेंट घेण्यात आला असून यामध्ये १५ च्यावर अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४९६ हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील व डेटा सायन्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
“टेक्नोरीओन – २०२५” या उपक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढावे त्याचबरोबर स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना एक तांत्रिक कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे या हेतूने या उपक्रमाचे सलग सतरा वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात येत आहे. सध्या इन्फॉरमेशन अन् टेक्नोलॉजीचे वारे अभियांत्रिकीच्या जगात घुमत आहे. आणि याच अनुषंगाने रोबोटिक्स शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि एम्बेडेड सिस्टम, प्रोग्रामिंग व मेकॅट्रॉनिक्समध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे असे नमूद करत त्यांनी यावेळी स्पर्धेच्या समन्वयकांचे उत्तम नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. यानंतर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले कि, “टेक्नोरीओन” स्पर्धेने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वृद्धीसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा तांत्रिक स्पर्धांद्वारे तरुणांच्या उत्साहाला विधायक दिशा मिळते. कौशल्य विकास आणि सक्षमता हाच नव्या युगाचा मंत्र आहे. अचूक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्ती अभियंत्यास सक्षम बनवते. हा उपक्रम विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रातील त्यांच्या सर्जनशील प्रवृत्तीचा शोध घेण्याची संधी प्रदान करीत असून विद्यमान तंत्रज्ञानामध्ये सुधारणा आणि विकसित करण्याची संधीदेखील या उपक्रमाद्वारे विध्यार्थ्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या स्पर्धेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ग्रुप, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ग्रुप यांनी अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांचे मॉडेल्स तयार केलेत. तर प्रोजेक्ट एक्झिक्यूशन व रोबोटीक्स स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचे उत्तम नियोजन, आकर्षक बक्षिसे, विविध विषयांवरील माहितीचे आदान प्रदान यांची संधी मिळाल्यामुळे सहभागी स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिखिता सातव व रिया भंगाळे या विद्यार्थिनींनी केले तर प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी आभार मानले. तसेच उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
तांत्रिक कलांचा आविष्कार
“टेक्नोरीओन” या इव्हेन्ट दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील प्रोफेशनल आयुष्यात ज्या गोष्टींना सामोरे जायचे आहे त्याच अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात कनेक्ट इट, एबीसी क्विज, चाॅप स्ट्रक्चर, ब्रिज बिल्डर, पेपर फ्लाईट, बॉक्स क्रिकेट, इलेक्ट्रॉमेज, इलेक्ट्रॉनिक्स सिम्युलेटर, गेस द लोगो टेक एडिशन, तसेच टेक स्कॅव्हेजंर या विविध स्वरूपाच्या स्पर्धा येथे घेण्यात आल्या व ‘क्रॅक द सर्किट’ स्पर्धेत विध्यार्थ्यानी स्वतः बनविलेल्या पजलमध्ये एका इलेक्ट्रॉनिक्स ट्रॅकवर नेव्हिगेट केले.
या विध्यार्थ्यानी मिळविले यश
कनेक्ट इट या स्पर्धेत शहेजाद रसूल सय्यद, राजनंदिनी घनश्याम सपकाळे, एबीसी क्विज : वैभव संदीप दैवद्य, प्रथमेश संजय मिसार, कोमल जे. कुयटे, वैष्णवी कुयटे,व्ही बी कोलते, ब्रिज बिल्डर : नयन रूपेश राजपूत, चंदन सुरेश महाजन, पेपर फ्लाईट : प्रेम किशोर तळेले, दर्शन तेनुराम चौधरी, इलेक्ट्रॉमेज : शिवमसिंग राजपूत आणि स्नेहा सूर्यवंशी, गेस द लोगो : लोकेश मंगल महाले, प्रणव विजय वाघ, नितीश आसाराम राठोड तसेच क्रॅक द सर्किट स्पर्धेत केदार विजय सोनार व लोकेश भरत पाटील या विध्यार्थ्यानी पारितोषिके पटकावली
प्रतिक्रिया
जी. एच. रायसोनी महाविद्यालय आयोजित “टेक्नोरीओन” या उपक्रमातील विविध स्पर्धेत भाग घेतल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नांची उकल करणे, विचारमंथनाने अनेक उपायांमधून योग्य उपाय शोधणे, त्याची योग्यता पटवून देणे, याचे ज्ञान मिळते. तसेच, या स्पर्धांमधून उद्योगाशी संबंधित प्रश्न हाताळले जात असल्याने कामाचा अनुभवही मिळतो.
प्रा. डॉ. संदीपकुमार बाविस्कर
संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख,
सुरेश पाटिल इस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (पॉलिटेक्निक), चोपड़ा
अभ्यासक्रमपूरक “टेक्नोरीओन” या तांत्रिक स्पर्धामध्ये भाग घेतल्याने आमच्यासारख्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. वेळेचा आणि संसाधनाचा योग्य विनियोग-नियोजन या बाबींबरोबर नेतृत्वगुणांचा विकासही होतो. संघात काम केल्याने संघभावना वाढीस लागते. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला एक तांत्रिक कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबदल जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे आभार.
हेतल पाटील
(विद्यार्थिनी) आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविध्यालय, शिरपूर

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम