
जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा बिगुल वाजला ; नोंदणीसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा बिगुल वाजला ; नोंदणीसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
जळगावात रंगणार प्राथमिक फेरी ; विजेत्यांसाठी १ लाख ११ हजारांचे पहिले पारितोषिक
जळगाव: राज्यातील रंगभूमीवरील तरुणाईच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे “जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे तर अंतिम फेरी नागपूर येथे पार पडणार आहे.
स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले असून, यात अव्वल ठरणाऱ्या तीन एकांकिकांना अंतिम फेरीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. अंतिम फेरी १ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नागपूर येथे रंगणार आहे.
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली असून प्रथम क्रमांक ₹१,११,०००, द्वितीय ₹७१,०००, तृतीय ₹५१,०००, तर प्रथम व द्वितीय उत्तेजनार्थ संघांना प्रत्येकी ₹२१,००० ची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय व्यक्तिगत व विशेष पुरस्कार देखील दिले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांना ₹११,०० प्रवेश शुल्क भरावे लागणार असून, नोंदणीची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज व नियमावली https://ghraisonikarandak.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, मुख्य समन्वयिका मृणाल नाईक आणि जी. एच. रायसोनी करंडक टीम यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी जळगाव आयोजन समिती प्रमुख बापूसाहेब पाटील मो. ९१७५७५८६३० किंवा ८००७६८४९६० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम