
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये मुलींसाठी आरोग्य व जीवन कौशल्यविकास उपक्रम
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये मुलींसाठी आरोग्य व जीवन कौशल्यविकास उपक्रम
जळगाव, शहरालगत असलेल्या सावखेडा शिवार येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींसाठी किशोरवयीन आरोग्य व जीवन कौशल्यविकास उपक्रम राबविण्यात आला. हा अभिनव उपक्रम मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या उपक्रमाला सखी सावित्री समितीच्या पुढाकाराने मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिता बाविस्कर व डॉ. भावना चौधरी हे आरोग्य विशेषज्ञ उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या दरम्यान योग्य स्वच्छता कशी पाळावी, पाळी दरम्यान येणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांशी कसा सामना करावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनींसाठी प्रश्नोत्तरे सत्र देखील राबविण्यात आले. मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी विद्यार्थिनींना या विषयावर खुलेपणाने संवाद साधण्याचे आवाहन करत समाजात अजूनही असलेले गैरसमज दूर करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौम्या काबरा, आशिता रायसोनी, विधी सोनी, गीत जैन या विद्यार्थिनींनी केले तर सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम