
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
जळगाव, : जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल सावखेडा शिवार, जळगाव येथे प्ले ग्रुप ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन सणाचं औचित्य साधत हा दिवस खास बहिण भावाचे नाते जपण्यासाठी, व त्यामधील जिव्हाळा टिकवण्यासाठी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून यावेळी नृत्य, गायन व रॅप असे मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यात आले. व राखी बनवा स्पर्धाही यावेळी संपन्न झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधत चॉकलेट व बिस्कीट देऊन मैत्रीचे नाते अधिक घट्ट केले.स्कूलच्या संचालिका सौ. पलकजी रायसोनी यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून हा कार्यक्रम राबविण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम