
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल सावखेडा शिवार जळगाव येथे रंगली चिमुकल्यांची “दहिहंडी”
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल सावखेडा शिवार जळगाव येथे रंगली चिमुकल्यांची “दहिहंडी”
राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धेने आणली रंगत ; गोपाळकाला निमित्ताने दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरी
जळगाव, : ‘गोविंदा आला …रे आला’च्या गजरात श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत नृत्य करत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्यांनी दहिहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. या प्रसंगी राधा कृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सुरवातीला स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी राधा-कृष्णच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. शाळेतील सर्व चिमुकल्यांनी राधा कृष्ण, गोपी-गोपिका यांच्या वेशभूषा करुन गरबा खेळला. त्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. दहीहंडी का व कशी साजरी करतात याची माहिती घेऊन राधा व कृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी दहिहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले तसेच राधांनी टिपऱ्यांचा फेर धरून आनंद साजरा केला तर, बालगोपाल दहिहंडी फोडण्यात चपळाई दाखवत होते. ‘मुलांच्या आतील साहस वाढवणे, एकीचे महत्व पटवून देणे यासाठी दहिहंडीचा उपक्रम राबविण्यात आला. राधा व कृष्ण या व्यक्तीरेखा मुलांना समजावून देण्यात आल्या,’ याप्रसंगी मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांनी मुलांचा उत्साह वाढवला. तसेच तीन थर रचून विद्यार्थ्यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी अभिनंदन के

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम