जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवा कार्यशाळा

बातमी शेअर करा...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवा कार्यशाळा

पालकांसमवेत चिमुकल्या हातांनी साकारला बाप्पा

 

जळगाव, ता. २६ : शहरालगत असलेल्या सावखेडा‎ येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

स्पर्धात्मक वातावरणात मुलांनी आपल्या कलाकौशल्याचे सुंदर दर्शन घडविले. शाडू मातीचा वापर करून बनविलेल्या आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्तींमुळे उपस्थितांचे मन मोहून गेले. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये धैर्य मंडोरे याने प्रथम क्रमांक, तर स्तुती मणियार हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाच्या शेवटी सारिका शर्मा यांनी आभार प्रदर्शन करून सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरुची मिस यांनी प्रभावीपणे केले. तर कार्यक्रम संयोजक म्हणून अर्जुन चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यशाळेतील सर्जनशील कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षक म्हणून मोहन गोमासे व अर्जुन चौधरी उपस्थित होते.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये सर्जनशीलतेला वाव मिळाला तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक संदेशही देण्यात आला. शाडू मातीच्या मूर्तींद्वारे प्रदूषणमुक्त व हरित गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा व संचालिका श्रीमती पलक रायसोनी यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम