
जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे “अटल सारथी” अंतर्गत एकदिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा
जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे “अटल सारथी” अंतर्गत एकदिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचा मोठ्या संख्येने सहभाग
जळगाव,: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निती आयोग व अटल इनोव्हेशन मिशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात “Arduino UNO-R4” या विषयावर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध विध्यालयातील शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे समजावून सांगताना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, उत्तर महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या व ज्या सीबीएसई स्कूल मध्ये अटल लॅबचा समावेश आहे अश्या स्कूलमधील शिक्षकांना विज्ञानतंत्रज्ञानाचा वापर करत आजच्या विध्यार्थ्यांना ते २१ व्या शतकातील कौशल्ये कशा प्रकारे देतील याचा विचार करत व “टू एम्पावर द स्कूल ऑन इनोव्हेशन” हे कल्चर प्रत्येक शाळेत रुजवाण्याची जबाबदारी निती आयोग तसेच अटल इनोव्हेशनने जी. एच. रायसोनी महाविद्यालयावर सोपवली असून स्कूल व शासन यामधील दुवा ठरत “अटल सारथी” या भूमिकेतून प्रत्येक महिन्यात नवतंत्रज्ञानावर आधारित विविध कार्यक्रम घेण्याचे ठरले असून या ट्रेनिंगमधील महत्वाचे मुद्दे व गरजा लक्षात घेवून त्या शासनाला कळविण्यात येणार आहे अन याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून हा पहिला उपक्रम यावेळी संपन्न झाला. या उपक्रमात “Arduino UNO-R4’ ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी संकल्पनेवर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून शिकण्याची नवी दिशा देते. आजच्या काळात IoT, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्मार्ट सिस्टिम्स यांचा वापर वाढत आहे. या सर्व क्षेत्रांसाठी Arduino UNO-R4 हे एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. भविष्यातील उद्योग व संशोधन क्षेत्रामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांना हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरेल.
या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डायलबाग एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे श्री. साहिल राजपूत व बाघरा येथील स्वामी कल्याण देव डिग्री महाविद्यालयातील श्री. सौरभ कुमार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, Arduino UNO R4 ही Arduino UNO मालिकेची नवीनतम आवृत्ती आहे ती २०२३ मध्ये सादर झाली यामध्ये आधीच्या UNO (R3) च्या तुलनेत अधिक शक्तिशाली मायक्रोकंट्रोलर, जास्त मेमरी आणि आधुनिक फिचर्स आहेत यावेळी मुख्य उद्दिष्टांमध्ये प्रोग्रॅमिंग, सेन्सर इंटरफेसिंग व प्रकल्प विकासाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे तसेच Arduino UNO-R4 चा वापर करून अध्यापन पद्धतीत नवोन्मेष घडवून विद्यार्थ्यांना STEM शिक्षणासाठी प्रेरित करणे हे विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व प्रा. डॉ. निलेश इंगळे यांनी समन्वय साधले तर संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. योगिता धांडे, प्रा. पल्लवी सुरवाडे, प्रा. डॉ. सोनल पाटील, प्रा. डॉ. स्वाती पाटील, प्रा. डॉ. चेतन चौधरी, प्रा. डॉ. दीपक नेमाडे, प्रा. तुषार वाघ, प्रा. पूजा नवल, प्रा. शरयू बोंडे, प्रा. प्रियांशी बोरसे, प्रा. रश्मी झांबरे, प्रा. प्रियांका बर्डे, प्रा. रुशाली कथोरे व प्रा. विपिन कुमार यांनी विशेष सहकार्य केले.
डिजिटल साधनांचा वापर करून अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली असून विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम