जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “सेंटर ऑफ एक्सीलन्स”ची स्थापना : अल्ट्राटेक सिमेंटसोबत ऐतिहासिक करार

बातमी शेअर करा...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “सेंटर ऑफ एक्सीलन्स”ची स्थापना : अल्ट्राटेक सिमेंटसोबत ऐतिहासिक करार

जळगाव | जी. एच. रायसोनी महाविद्यालयात अल्ट्राटेक सिमेंटच्या सहकार्याने “सेंटर ऑफ एक्सीलन्स”ची स्थापना करण्यात आली असून, या उपक्रमामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग व टिकाऊ बांधकाम क्षेत्रातील संशोधन, प्रकल्प आणि प्रशिक्षणाला गती मिळणार आहे.

कार्यक्रमात बोलताना अरविंद महाजन यांनी या कराराला शिक्षणसंस्था व उद्योगातील आदर्श भागीदारी ठरवत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव, मेंटरशिप व टिकाऊ तंत्रज्ञानाची संधी मिळेल असे सांगितले. या भागीदारीमुळे महाविद्यालयाचे संशोधन वातावरण समृद्ध होऊन विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढेल.

रिजनल हेड बाळकृष्ण कुलकर्णी यांनी या करारामुळे विद्यार्थ्यांना रिसर्च, प्रॅक्टिकल ट्रेनिंग व इंडस्ट्री मेंटरशिप थेट मिळणार असल्याचे नमूद केले.

सेंटर ऑफ एक्सीलन्सची प्रमुख उद्दिष्टे :

सिमेंट व कॉंक्रिट तंत्रज्ञानातील संशोधन

टिकाऊ व पर्यावरणपूरक बांधकाम प्रकल्प

प्रशिक्षण, कार्यशाळा व प्रमाणन कार्यक्रम

संयुक्त संशोधन उपक्रम

स्मार्ट बिल्डिंग व ग्रीन टेक्नॉलॉजीवरील अभ्यास

या कार्यक्रमात उद्योजक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाखेटे यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम