
जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे दुहेरी क्रीडा यश ; रौप्य पदक आणि ४ खेळाडूंची निवड
जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे दुहेरी क्रीडा यश ; रौप्य पदक आणि ४ खेळाडूंची निवड
मल्लखांबमध्ये सागर चौधरीचे रौप्य यश; तर ४ खेळाडूंची ‘अश्वमेध–२०२५’ या स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड
जळगाव : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथील खेळाडू सागर किशोर चौधरी याने अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पिरॅमिड प्रकारात रौप्य पदक पटकावले. ही स्पर्धा २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान विनायक मिशन रिसर्च फाउंडेशन, चेन्नई येथे झाली. सागर हा सलग तीन वर्षे विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करत असून त्याचे हे सततचे उत्कृष्ट योगदान गौरवण्यासारखे आहे.
दरम्यान, जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील ४ खेळाडूंची ‘अश्वमेध क्रीडा स्पर्धा–2025’ साठी क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. यात टेबल टेनिस : योगेश्वरी भोई, वेदांती पाटील बास्केटबॉल : धनश्री पाटील, खुशी सूर्यवंशी यांचा समावेश आहे. ही स्पर्धा ४ ते ८ डिसेंबर दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणार आहे.
यावेळी खेळाडूंचा सत्कार करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थी केवळ शैक्षणिक नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही चमकत आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. सातत्य, शिस्त आणि क्रीडाप्रेम या गुणांमुळेच आज विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत आहेत. महाविद्यालय त्यांना आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहील, असे मत प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व क्रीडा संचालक सागर सोनवणे उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम