जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “शिवजयंती” उत्साहात साजरी

शिव जन्मोत्सव, पोवाडा गायन व किल्ले बनवा स्पर्धेने आणली रंगत

बातमी शेअर करा...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “शिवजयंती” उत्साहात साजरी

शिव जन्मोत्सव, पोवाडा गायन व किल्ले बनवा स्पर्धेने आणली रंगत

 

जळगाव प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेच्या आवारात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन वंदन करून केले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षक अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, दादाजी कोंडदेव, मावळे यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषांनी संपूर्ण वातावरण शिवकालीन झाले होते. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली. त्यामुळे सर्व वातावरण प्रसन्न होऊन विद्यार्थ्यामध्ये जोश निर्माण झाला. “टोडलर टेल्स” या प्राथमिक विभागामधील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा करून महाराजांचे प्रेरणादायी बोल सादर केले तसेच ‘स्वराज्य स्थापनेची शपथ’ यावर नाटिका इ. ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केली. ‘अफझलखानाचा वध’ यावरील पोवाडा गायनाने वातावरण जोशपूर्ण झाले. तसेच राज आलं..राज आलं.. हे शिवाजी महाराजांवरील गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी शिवाजी महाराज यांच्यात असलेले गुण विद्यार्थी दशेतील मुलांना देखील उपयोगी आहे व त्या गुणांचा वापर आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कशाप्रकारे केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करत शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगाचे उदाहरण सांगून ते पूर्ण जगात वंदनीय का आहेत व त्यांना रयतेचा राजा असे का म्हटले जाते हे विषद केले.

यावेळी किल्ल्यांचे भव्य प्रदर्शन सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहावीत शिकणाऱ्या अबीर ठाकूर व सानवी बाविस्कर या विद्यार्थ्यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम