
जुना वाद उफाळला, लक्ष्मी नगरात तिघा तरुणांना मारहाण
जुना वाद उफाळला, लक्ष्मी नगरात तिघा तरुणांना मारहाण
आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव: जुन्या भांडणाच्या कारणावरून जळगाव शहरातील लक्ष्मी नगरात मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास तिघा तरुणांना मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री अकरा वाजता आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय कैलास जाधव (वय २२, रा. लक्ष्मी नगर) हा तरुण त्याचे मित्र आकाश प्रकाश बाविस्कर आणि हर्षल रविंद्र जैस्वाल यांच्यासोबत गप्पा मारत असताना ही घटना घडली. जुन्या वादातून तनवीर उर्फ तान्या शेख आणि त्याच्यासोबतचे तीन अनोळखी व्यक्ती तिथे आले. त्यांनी तिन्ही तरुणांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या मारहाणीनंतर जखमी झालेल्या अजय जाधव याने तात्काळ जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून, तनवीर उर्फ तान्या शेख आणि त्याच्या साथीदारांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम