
जुन्या वादातून तरुणाला शिवीगाळ करीत लाठी काठीने मारहाण
जुन्या वादातून तरुणाला शिवीगाळ करीत लाठी काठीने मारहाण
शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव : जुन्या वादातून तरूणाला शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजता कांचन नगर परिसरातील उज्ज्वल चौकात घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी रात्री साडेनऊ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कांचन नगरातील चौघुले प्लॉट परिसरात रदुर्गेश चंद्रकांत सपकाळे (वय २२) हा तरुण वास्तव्यास आहे. शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुर्गेश सपकाळे हा कांचन नगरातील उज्ज्वल चौकात उभा असतांना जुन्या
वादातून धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड (पुर्ण नाव माहिती नाही) आणि यांच्या सोबत असलेले अनोळखी दोघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच यातील एकाने हातात लाकडी काठी घेवून मारहाण करत दमदाटी केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मारहाण करणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा
याप्रकरणी अखेर रात्री शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड (पुर्ण नाव माहिती नाही) आणि यांच्या सोबत असलेले अनोळखी दोन व्यक्ती यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम