इकरा थीम कॉलेजमध्ये जुन्या नोटा आणि नाण्यांचे प्रदर्शन म्हणजे मजीद सेठ झकेरिया यांच्या प्रयत्नांचे उत्तम उदाहरण – सुरेश दादा जैन

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि २९ डिसेंबर २०२३

इकरा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलीत एच.जे.थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरुण जळगावतर्फे जुन्या नोटा व नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अब्दुल करीम सालार होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन माजी मंत्री सुरेश दादा जैन होते. या कार्यक्रमात विशेष पाहुणे डॉ.इकबाल शाह, एजाज मलिक, अमीन भाई बादलीवाला, प्रा.जफर शेख, अब्दुल रशीद शेख, आदी तसेच मजीद सेठ झकेरिया, युवराज संजय वाणी, नितीन भाऊ लढा, कमलेश वासवानी, चौधरी सर, मित्रमंडळी. ज्येष्ठ नागरिक गटातील सर्व मित्रांनी सहभाग घेतला.

इफ्तिखार अहमद यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात आयटीआयचे विद्यार्थी शोएब खान याच्या पवित्र कुराण पठणाने झाली. त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमात पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सुरेशदादा जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, अब्दुल मजीद सेठ यांचा हा प्रयत्न 60, 70 वर्षांचा आहे. त्यांनी जुन्या नोटा, नाणी, जुन्या आठवणी इत्यादींसह पुढील पिढीसाठी पुरेसा आधार गोळा केला आहे.

या प्रदर्शनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अध्यक्षीय भाषण डॉ.अब्दुल करीम सालार यांनी केले. आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.चांदखान यांनी मानले.

कार्यक्रमा च्या यशस्वीते साठी ईकरा आय टी आय चे जावेद सर, जहूर सर, महाजन सर, इजाज सर, तस्लीम खान, युनूस सर आदींसह अशफाक पठाण, फरहान शेख, शेख कामिल, अब्दुल अजीज शाह, शाहिद शेख, वसीम शेख यांनी परिश्रम घेतले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी देखील परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम