
जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
जळगाव शहरातील तांबापुर परिसरातील घटना
जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
जळगाव शहरातील तांबापुर परिसरातील घटना
जळगाव, शहरातील तांबापूरा परिसरातील मच्छीबाजार येथे जुन्या वैमनस्यातून एका १८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल शहा सद्दाम शहा (वय १८, रा. तांबापूरा) हे बुधवारी रात्री मच्छीबाजार परिसरात असताना, त्याच भागातील रिहान मेहमुद शेख याने जुन्या वादाच्या कारणावरून साहिल याला अर्वाच्य शिवीगाळ करत धारदार शस्त्राने हातावर व मानेवर वार केले. या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत.
घटनेनंतर साहिल शहा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार संशयित रिहान मेहमुद शेख याच्याविरुद्ध गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम