
जून्या भांडणावरुन तिघांची एकाला लाकडी दांडक्याने मारहाण
जून्या भांडणावरुन तिघांची एकाला लाकडी दांडक्याने मारहाण
धामणगाव फाट्याजवळील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : जून्या भांडणावरुन विनोद मंगा साळुंखे (वय ५०, रा. शिरागड, ता. यावल) यांना तिघांनी लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना दि. २६ रोजी सकाळच्या सुमारास धामणगाव फाटा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील शिरागड येथे विनोद मंगा साळुंखे हे वास्तव्यास असून ते मजूरी काम करतात. दि. २६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धामणगाव फाटा येथे उभे होते. यावेळी तिघे जण त्याठिकाणी आले आणि त्यांनी विनोद साळुंखे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी याला जास्त झाली आहे असे म्हणत मधुकर साळुंखे यांनी त्यांना पकडून ठेवले. तर
आप्पा साळुंखे व कैलास साळुंखे या दोघांनी लाकडी काठीने त्यांना मारहाण केली. यामध्ये त्यांच्या कपाळावर आणि नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर विनोद साळुंखे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आप्पा मधुकर साळुंखे, कैलास मधुकर साळुंखे, मधुकर हिरामण साळुंखे (सर्व रा. शिरागड, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ सुनिल पाटील हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम