
जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना भगवंतराव इंगळे स्मृति पुरस्कार
जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना भगवंतराव इंगळे स्मृति पुरस्कार
अमळनेरः येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते अकोला येथील पत्रमहर्षि भगवंतराव इंगळे यांच्या नावाचा प्रतिष्ठेचा स्मृती पुरस्कार सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार विचारवंत मधुकर भावे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महेश म्हात्रे, ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, कार्याध्यक्ष
शिवराज काटकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा जयपुरकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजाभाऊ आदाटे, परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सुरभाई शेख, डिजीटल मिडीयाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, गोपि लांडगे, बापू ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थित होती. ७० वर्षीय पांडूरंग पाटील हे उच्चविद्याविभूषित असून ५० वर्ष प्रदिर्घ पत्रकारितेचा त्यांचा अनुभव आहे. प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पांडूरंग पाटील यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम