
जैन हिल्स येथे क्रिकेट पंचांची कार्यशाळा
जैन हिल्स येथे क्रिकेट पंचांची कार्यशाळा
जळगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे व जळगाव जिल्हा क्रिकेट असोशिएशन आयोजित क्रिकेट पंचांची कार्यशाळा दि. १३ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. जैन हिल्स येथील सुबीर बोस हॉलमध्ये ही कार्यशाळा घेण्यात येईल. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून होत असलेल्या कार्यशाळेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पंच संदीप चव्हाण, संदीप गांगुर्डे, मंगेश नार्वेकर मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे दरवर्षी क्रिकेट चा मौसम सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्रातील परिक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पॅनेलवर असलेल्या पंचांचा साठी मार्गदर्शक अशा कार्यशाळेचे आयोजन केले जाते. यात विविध क्रिकेट नियम व त्यातील बारकावे यांचा ऊहापोह पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे करण्यात येतो. तसेच मैदानावरील पंच म्हणून आपली भूमिका व कर्तव्य याबाबतही सविस्तर चर्चा व मार्गदर्शन या दोन दिवशीय कार्यशाळेत केले जाणार आहे. कार्यशाळेत महाराष्ट्रातील ५७ पंच सहभागी होणार आहे. यांपैकी जळगाव जिल्ह्यातील उत्तीर्ण पंच वरुण देशपांडे व मुश्ताक अली हे सहभागी होत आहे. अशी माहिती जळगाव जिल्हा क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे यांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम