बातमीदार | दि १३ जानेवारी २०२४
ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा व वेदनांची आपणास जाण आहे – माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे
चोपडा – येथील ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा व वेदनांची आपणास जाण आहे काही दिवसानंतर आम्हाला देखील याच मार्गाने जायचे आहे पूर्वी जेष्ठ नागरिकांचा एकत्र कुटुंबात खूप सन्मान व्हायचा आता तो तसा राहिलेला नाही.
वृद्धाश्रम ही संकल्पना आल्यानंतर माझ्यासारख्याला वाटते की वृद्धाश्रम व्हायलाच नको असे प्रतिपादने माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी येथे केले.
चोपडा जेष्ठ नागरिक संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात माजी आमदार सोनवणे पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करण्यास मी सदैव उत्सुक असतो.
मला त्यांच्याशी चर्चा करताना खूपबरे वाटते. पुढे आपल्याकरिता जो निधी मंजूर केला होता, तो देण्यास मी बांधील आहे, असेही त्यांनी यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सांगितले.
आमदार लताताई सोनवणे, माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी, माजी नगरसेवक प्रकाश राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर हजर होते.
कार्यक्रम प्रारंभी दीपप्रज्वलन केल्यानंतर आमदार व माजी आमदार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
चोपडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय करोडपती यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
गोपाल पाटील, कैलास बाविस्कर, शिवसेनेच्या तालुका अध्यक्ष मंगलाताई पाटील यांचे स्वागत शेतकरी संघाच्या माजी संचालिका सौ देशमुख यांनी केले.
सौ शितल देवराज यांचे स्वागत श्रीमती शकुंतला बेन गुजराथी यांनी केले.
या कार्यक्रमाला आधी ढोलेरा सिटी मेस्ट्रोडीया ग्रुप नवनिर्मिती संदर्भातले चित्रण, राजेश जी गुप्ता, गोवर्धनजी पाटीदार, करण राजपूत यांनी उपस्थित ज्येष्ठांना दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी. महाजन यांनी केले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ एम. डब्ल्यू पाटील, नेरपगार, मधुकर साळुंखे, अनिल पालीवाल, ज्येष्ठ पत्रकार व कवी रमेश जे पाटील, फोटोग्राफर छोटू वार्डे, आडगाव येथील चैत्राम महाजन,
जयंत कुलकर्णी, माजी सरपंच पंडित रामदास पाटील, सत्रासेन ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश ठाकूर व मान्यवर सभासद यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम