ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑक्टोबर रोजी कार्यशाळाचे आयोजन

बातमी शेअर करा...

ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑक्टोबर रोजी कार्यशाळाचे आयोजन

जळगाव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ, चैतन्य नगर, गणेश कॉलनी जवळ येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा मंगळवार, ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता होणार असून, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या कायदे, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपलब्ध सोयी-सवलती व त्यांची अंमलबजावणी याबाबत माहिती दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव डॉ. अनिता राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम