
ज्येष्ठ नागरिकाला ५३ लाखात गंडविणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
ज्येष्ठ नागरिकाला ५३ लाखात गंडविणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
जळगाव : जमीन अधिग्रहण व्यवसायातून ५ ते ६ पटीने नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून जेष्ठ नागरीकाला ५३ लाखांत गंडवण्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयीतांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील रहिवासी गोपाळ प्रभूलाल राठी यांना संशयीत विजय जगदीश मंडोरा (वय ४५) आणि लक्ष्मीनारायण जगदीश मंडोरा (वय ४७, दोघ रा. पिंप्राळा) यांनी त्यांच्या जमीन अधिग्रहण व्यवसायातून ५ ते ६ पटीने नफा मिळवुन देण्याचे आमीष दाखवले. परतावा देण्याचे सांगून बँक खाते तसेच रोख रकमेच्या स्वरूपात ५३ लाख ४० हजार रुपये उकळले. घेतलेले पैसे परत न देता धमकावल्या प्रकरणी गोपाळ राठी यांनी रामानंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखे कडे वर्ग झाल्यावर निरीक्षक संदिप पाटील, सहाय्यक निरीक्षक ईश्वर पाटील यांच्या पथकाने तपासाअंती संशयीत विजय जगदीश मंडोरा व लक्ष्मीनारायण जगदीश मंडोरा अशा दोघांना अटक केली. दोघांना आज न्यायलायात हजर केल्यावर त्यांना पाच दिवसांच्या कोठडीत रवाना करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम