ज्वेलर्सच्या दुकानातून चोरट्यांनी २ लाखांचा ऐवज केला लंपास

नाशिक येथील घटनेमुळे खळबळ

बातमी शेअर करा...

ज्वेलर्सच्या दुकानातून चोरट्यांनी २ लाखांचा ऐवज केला लंपास
नाशिक येथील घटनेमुळे खळबळ
नाशिक: शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका सोन्या-चांदीच्या दुकानात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी, १४ मार्च रोजी पहाटे उघडकीस आली.

महात्मा गांधी मार्गावरील एका प्रतिष्ठित सराफा दुकानात बुधवारी रात्री चोरट्यांनी शटर तोडून प्रवेश केला. दुकानातील सोन्याच्या दागिन्यांसह चांदीच्या वस्तूंची चोरी करण्यात आली. सकाळी दुकान उघडताना ही घटना समोर आली. दुकानमालकाने तातडीने पोलिसांना माहिती दिली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, पोलीस निरीक्षक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम