
झाडाला गळफास घेऊन ५० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
झाडाला गळफास घेऊन ५० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
खादगाव येथील घटना; जामनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील खादगाव येथे एका ५० वर्षीय इसमाने टेकडीवर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिनकर मधुकर सोनवणे (वय ५०, रा. खादगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते आपल्या कुटुंबासह खादगाव येथे वास्तव्यास होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांनी एका बँकेकडून गृहकर्ज घेतले होते. शुक्रवारी (दि. १९ डिसेंबर) बँकेचे वसुली कर्मचारी त्यांच्या घरी आले होते. यानंतर त्यांनी जामनेर लगतच्या एमआयडीसी परिसरातील टेकडीजवळ एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सोनवणे यांना तात्काळ जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जयंत पगारे पुढील तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम