झोमॅटो, अॅमेझोन व इतर प्लॅटफॉर्म डिलीव्हरी बॉय वर्कर्स यांना नांव नोंदविण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...

झोमॅटो, अॅमेझोन व इतर प्लॅटफॉर्म डिलीव्हरी बॉय वर्कर्स यांना नांव नोंदविण्याचे आवाहन
जळगाव – केंद्र शासनाने नुकताच गिग वर्कर्स कामगारांसाठी ई-श्रम अंतर्गत नोंदणीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यात जे कोणत्याही कंपनीचे कायम कर्मचारी नसून, ते स्वतंत्रपणे काम करतात, जे पारंपारिक नियोक्ता – कर्मचारी या संबंधाबाहेर काम करतात. तसेच ते अल्पकालीन वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. जसे की, पार्सल डिलीव्हरी करणे, रिक्षा -कॅब चालविणे, झोमॅटो, स्विगी, ओला, उबर, झेप्टो, अर्बन कंपनी आणि इतर ऑनलाईन कामे करणाऱ्या तसेच सेल्यमन, हेल्पर, ऑटो चालक, ड्रायवार, पेपर विक्रेते, ऑनलाईन मार्केटिंग, ग्राफिक डिझाईनिंग इत्यादि सर्व असंघटित कामगारांसाठी ई-श्रम अंतर्गत नोंदणीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यास अनुसरुन ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम वर नोंदणी करुन शासनाच्या विविध योजनांचे जास्तीत जास्त लाभ मिळवून घेण्यासाठी नोंदणी करणे अतिशय गरजेचे आहे. तरी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन ओळखपत्र मिळविण्याची संधी या वर्षी पुन्हा तिसऱ्या वेळेस दिलेली आहे. ओळखपत्र मिळाल्यानंतर दुर्दैवाने अपघातासह अन्य कारणास्तव दिव्यांगत्व आल्यानंतर सदर असंघटित कामगारांना कामगार विभागाच्यावतीने १ लाख मदत मिळण्यास मदत होणार आहे.
अशी करा नोंदणी :-
eshram.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर ऑन ई-श्रमवर क्लिक करा, आधारकार्डाशी लिंक असलेला मोबाईलवर नंबर आणि कॅप्या कोड टाका. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरांच्या माध्यामातून नोंदणी करा. ओटीपी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचा अर्ज भरा आणि सबमिट करा. जर असंघटित कामगार ऑनलाईन नोंदणी करु शकत नसेल तर त्यांनी जवळच्या महाई-सेवा केंद्रावरुन अर्ज भरु शकतात.
काय फायदा मिळणार ?
ई-श्रम कार्ड असलेल्या असंघटित कामगारांना ६० वर्षे पुर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन, २ लाखांचा मृत्यू विमा आणि १ लाखांची आंशिक अपंगत्वापोटी आधिक मदत मिळणार आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा उपलब्ध असुन वयाच्या साठीनंतर पेन्शनही मिळणार, हेल्पलाईन नंबर ई-श्रम कार्ड हेल्पलाईन टोल फ्री नंबर (सोमवार ते रविवार)- १४४३४ ई-श्रम ईमेल आयडी eshramcare-mole@gov.in या प्रमाणे आहे. असे सहाय्यक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम