
टवाळखोरांना खडसावणाऱ्या वृद्ध महिलेला ठार मारणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या
टवाळखोरांना खडसावणाऱ्या वृद्ध महिलेला ठार मारणाऱ्या तिघांच्या मुस्क्या आवळल्या
एलसीबी आणि पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची 48 तासात कारवाई
पाचोरा प्रतिनिधीl टिंगल करणाऱ्या टवाळखोरांना खडसावणाऱ्या वृद्ध महिलेची तीक्ष्ण हत्यारांनी खून करून महिलेच्या अंगावरील दागिने ओरबडून अज्ञात व्यक्तींनी पलायन केल्याची घटना पिंपळगाव हरेश्वर जवळ असणाऱ्या शेवाळे येथे पाच जून रोजी घडली होती. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या 48 तासांमध्ये तीन संशयीतांच्या मुसक्या आवडल्यात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार पाच जून रोजी रात्री नऊ ते अकरा वाजेच्या सुमारास शेवाळे गावात राहणाऱ्या 85 वर्षीय जनाबाई महारु पाटील यांच्या राहत्या घरात अज्ञात व्यक्तींनी दरवाज्यातून प्रवेश करून त्यांच्या डोक्यात तीक्ष्णू वस्तूने घाव घालून त्यांना ठार केल्याची घटना घडली होती. तसेच संशयित आरोपींनी त्यांच्या अंगावरील दागिने चोरून नेले होते. या घटनेमुळे परिसरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती.
या प्रकरणी मयत जनाबाई पाटील यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 103(1), 311, 332अ अंतर्गत गुन्हा क्रमांक 151/2025 अनुषंगाने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्याला तपासासाठी विशेष सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शेवाळे गावात गोपनीय माहिती घेतली आणि संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले. यात साहिल मुकददर तडवी (वय २१ वर्षे), राकेश बळीराम हातागडे (वय २१ वर्षे), राजेश अनिल हातागडे (वय १८ वर्षे) सर्व रा. शेवाळे, ता. पाचोरा, जि. जळगाव या तिघांनाही ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे, ते जनाबाई पाटील यांच्या घरासमोर नियमित बसत असत आणि टिंगल-टवाळ्या करीत. यामुळे जनाबाई यांनी त्यांना खडसावले होते. राग मनात धरून त्यांनी खून व चोरी करण्याचा कट रचला.
ठरलेल्या योजनेप्रमाणे ५ जून रोजी रात्री मागच्या दरवाजातून घरात शिरून टणक हत्याराने जनाबाई पाटील यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने लंपास करून अंधारात पळ काढला.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगांव हरेश्वर पोलिसांच्या विविध अधिकाऱ्यांचा सहभाग होता. यामध्ये प्रमुख अधिकारी व कर्मचारी खालीलप्रमाणे: स्थानिक गुन्हे शाखा पीआय संदिप पाटील, पिंपळगांव हरेश्वर एपीआय प्रकाश काळे, पीएसआय शेखर डोमाळे, शरद बागल, विठ्ठल पवार, पो.उप.निरी. प्रकाश पाटील, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, महेश सोमवंशी, पोहेकॉ. नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, सागर पाटील सदर प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय प्रकाश काळे हे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम