
टहाकळी ग्रामपंचायतीला मू जे महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक विभागातील विद्यार्थ्यांची भेट
टहाकळी ग्रामपंचायतीला मू जे महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक विभागातील विद्यार्थ्यांची भेट
जळगाव प्रतिनिधी I के सी ई सोसायटीच्या मू जे महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक विभागातील प्राध्यापक आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी समुदाय सहभाग कार्यक्रमाअंतर्गत (कम्युनिटी ऐनगेजमेन्ट प्रोग्राम) ग्रामपंचायत टहाकली , ता. धरणगाव, जि. जळगाव येथे भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत डॉ. कविता पाटील, डॉ. विशाल भारुड, डॉ. प्रेमजीत जाधव आणि प्रा. भावना मानेकर उपस्थित होत्या.
डॉ. विशाल भारुड यांनी ग्रामस्थांना कार्यक्रमाची ओळख करून दिली तर डॉ. कविता पाटील यांनी महाविद्यालयाबाबत माहिती दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून सोलर कृषी पंप आणि सोलर ड्रोन बाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. डॉ. प्रेमजीत जाधव यांनी शासनाच्या नवीन योजनांची ग्रामस्थांना माहिती दिली तसेच ग्रामस्थांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन केले. सोबतच डॉ. कविता पाटील आणि प्रा. भावना मानेकर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसोबत शैक्षणिक खेळ खेळले आणि मुलांना भेटवस्तू दिल्या.
विद्यार्थ्यांनी पुढे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन प्रशासकीय कामकाज समजून घेतले. कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सविता सुरेश कोळी, उपसरपंच मधुकर सुखदेव पाटील ग्रामपंचायत अधिकारी श्री संजय गंगाराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जगन्नाथ कोळी आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश जगन्नाथ कोळी यांनी गावातल्या लोकांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
ग्रामस्थांच्या सौर कृषी पंपा बद्दल आणि कृषी ड्रोन प्रश्नांचे बद्दल डॉ. प्रेमजीत जाधव यांनी निवारण केले. समुदाय संवाद कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विशाल भारुड यांनी सर्व ग्रामस्थांचे आणि उपस्थित सरपंच,सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामविकास अधिकारी यांचे आभार मानले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम