टायर विक्रेत्याला पिस्तूलाचा धाक दाखवून दीड लाखांची लूट; ‘अज्जू डॉन’सह चौघांना अटक

बातमी शेअर करा...

टायर विक्रेत्याला पिस्तूलाचा धाक दाखवून दीड लाखांची लूट; ‘अज्जू डॉन’सह चौघांना अटक

सावदा (ता. रावेर) | प्रतिनिधी सावदा-पिंपरूड रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ भुसावळातील टायर विक्रेत्याला गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून दीड लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. ही थरारक घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. काही तासांतच पोलिसांनी ‘अज्जू डॉन’ बऱ्हाणपूरवाला याच्यासह चौघांना अटक केली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्कूटीवरून जात असताना अडवले

साजीद शेख अकबर (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हे निंभोरा येथून टायर विक्रीचे दीड लाख रुपये घेऊन स्कूटी (MH 19 EQ 2810) वरून परत येत होते. सावदा-पिंपरूड दरम्यान स्मशानभूमीजवळ पांढऱ्या रंगाच्या तवेरा कारमधून आलेल्या पाच जणांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी आरोपींनी गावठी पिस्तूल दाखवत त्यांच्याकडील दीड लाख रुपये लुटले आणि कार घेऊन फरार झाले.

पोलिसांची तत्पर कारवाई – आरोपी जेरबंद

या घटनेनंतर साजीद शेख यांनी सावदा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्जू डॉन उर्फ अजरोद्दिन उमर (वय 40, रा. गांधी कॉलनी, लालबाग, बऱ्हाणपूर), तौसिफ शेख अफजल (रा. रावेर), कमरोद्दीन इनोद्दीन (वय 42, रा. गांधी कॉलनी, लालबाग), शेख फारुख अलाउद्दीन (रा. ऐनपूर, ता. रावेर) यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी केवळ काही तासांतच या गुन्ह्याचा छडा लावत चौघांना अटक केली असून, उर्वरित एका आरोपीचा शोध सुरू आहे.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विशाल पाटील, पो.उ.नि. अमोल गर्जे, व पोलीस नाईक राहुल सानप करत आहेत. “लवकरच उर्वरित आरोपींना देखील अटक केली जाईल,” असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम