
टास्क पूर्ण करून अधिक नफ्याचे आमिष ; तरुणाला 5 लाखांत गंडविले
जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
टास्क पूर्ण करून अधिक नफ्याचे आमिष ; तरुणाला 5 लाखांत गंडविले
जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव I प्रतिनिधी
एका तरुणाला टास्क पूर्ण करून गुंतवणूक करण्याचे अमिश दाखवून त्याची पाच लाख ३२ हजारात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 24 वर्षीय तरुणाशी 4 जानेवारी ते 6 जानेवारी 2025 दरम्यान सोशल मीडियावरील टेलिग्राम साईटवरील रुची शर्मा, दीपशिखा रावत, दीप्पी राजवीर सिंग, सुमन ग्रोवर या महिला सायबर ठगांनी टेलिग्राम सोशल मीडिया साइटवरून वारंवार संपर्क केला.
त्याच्याशी चांगले बोलून विश्वास संपादन केला. दिलेले टास्क पूर्ण करून गुंतवणूक केल्यास त्यावर तुम्हाला अधिक नफा (बोनस) प्राप्त करून देतो, अशा थापा मारल्या. त्यानंतर तरुणाच्या खात्यातून वेळोवेळी 5 लाख 32 हजार 688 रुपयांची रक्कम ऑनलाइन स्वीकारली.
यानंतर संपर्क बंद केला. तरुणाला कोणताही मोबदला दिला नाही. मात्र तरुणाच्या खात्यातील बँक बॅलेन्स घेत ते रिकामे केले. आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शुक्रवार, 10 रोजी गुन्हा दाखल झाला. तपास सायबर पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम