टोरेस कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा !
विविध शाखांमधून सुमारे 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
टोरेस कंपनीचा ५०० कोटींचा घोटाळा !
विविध शाखांमधून सुमारे 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुंबई I वृत्तसंस्था
मुंबईत झालेल्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. गुंतवणूकदारांचे ५०० कोटी घेऊन ही कंपनी एकाच दिवसात गायब झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस प्रकरणात शनिवारपर्यंत कंपनीच्या विविध शाखांमधून सुमारे 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच कंपनीकडून बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणा-या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटविण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. टोरेसप्रकरणी दादरमधील कंपनीच्या शाखेत शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कंपनीने 15 वाहने विकत घेतल्याचे आणि ५ वाहने आरक्षित केल्याचे पुरावे सापडले आहेत.
आरोपींनी दादर येथे टोरेस कंपनीची शाखा सुरू करण्यासाठी प्रति महिना २५ लाख रुपये भाड्याने जागा घेऊन तेथे शो रूम उघडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी जागामालकाकडे चौकशी करीत आहेत. मालकाने केलेला भाडेकरार, रकमेचा व्यवहार आदी तपशिलाची चौकशी केली जात आहे.
टोरेस कंपनीच्या चिटफंड घोटाळ्यामुळे एकच खळबळ उडाली. या चिटफंड घोटाळ्या मागे युक्रेनियन मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात आहे. अशातच टोरेस घोटाळा प्रकरणात फरार आरोपी व्हिक्टोरिया हिचा सीसीटीव्ही समोर आला आहे. सहा जानेवारीला टोरेस घोटाळा प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर व्हिक्टोरिया आणि त्यांच्या अन्य युक्रेन साथीदारांनी पळ काढला असल्याची माहिती समोर आली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम