ट्रकची दुचाकीला धडक ; तरुणीचे पाय चिरडले, तरुण गंभीर जखमी

ट्रकची दुचाकीला धडक ; तरुणीचे पाय चिरडले, तरुण गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

ट्रकची दुचाकीला धडक ; तरुणीचे पाय चिरडले, तरुण गंभीर
जखमी

 

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाजवळील घटना

जळगाव, शहरातील आकाशवाणी चौकात गुरुवारी (१ मे) रात्री ८ वाजेच्या सुमारास ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुणीचे दोन्ही पाय चिरडले गेले, तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.जखमींची नावे नयन मिलिंद तायडे (वय २२, रा. महाबळ) आणि रोहित संजय माळी (वय २१, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) अशी आहेत. आकाशवाणी चौकातून उड्डाणपुलाकडे वळण घेत असताना मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत नयन रस्त्यावर पडली आणि ट्रकचे चाक तिच्या पायांवरून गेल्याने तिचे दोन्ही पाय गंभीररीत्या जखमी झाले. रोहितलाही गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम