ट्रकच्या धडकेत वृद्ध ठार

चाळीसगाव तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा...

ट्रकच्या धडकेत वृद्ध ठार

चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव प्रतिनिधी

ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी घडली. घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील ६२ वर्षीय वृद्ध ज्ञानेश्वर ईश्वर सूळ हे आज शनिवार बाजाराचा दिवस असल्याने बाजार करण्यासाठी चाळीसगाव येथे आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्कलजवळ त्यांना ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे

घटनास्थळी लागलीच मोठा जमाव जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचे गांर्भिय ओळखून तत्काळ वाहतूक शाखेचे पोलीस तसेच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस दाखल झाले. त्यानंतर मयत ज्ञानेश्वर सूळ यांना तत्काळ शासकीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवून वाहतूक सुरळीत केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम