
ट्रॅक्टरच्या व्यवहारावरून हाणामारी ; एक महिला जखमी
तळवेल येथील घटना
वरणगांव प्रतिनिधी
वरणगाव येथे ट्रॅक्टरच्या व्यवहारावरून झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय महिला जखमी झाल्याची घटना दि २३ रविवार रोजी दुपारी तळवेल येथे घडली आहे याबाबत सुनिल बाजीराव कोळी यांच्या फिर्यादी वरून वरणगांव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सुनिल कोळी यांनी सुमारे दीड वर्षा पूर्वी आरोपी कडुन ट्रॅक्टर विकत घेतले होते. त्या वेळी पन्नास हजार रुपये रोख दिले होते, परंतु व्यवहार न झाल्या कारणाने विश्वास पंढरी कोळी व शोभाबाई विश्वास कोळी राहणार तळवेल यांनी दि२३ रोजी फिर्यादी यांना शिवीगाळ करून फिर्यादीची
पत्नी सौ वंदना सुनिल कोळी हीला विश्वास कोळी याने शिवीगाळ करून हाताने दगड मारल्याने तोंडाला जखम होवुन दोन ते तीन दात घश्यात गेल्याने जखमी झाली व फिर्यादीचा पुतण्या नामे हर्षल जितेंद्र कोळी याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी वरणगांव पोलीस स्टेशनला सी सी टी एनएस गुरंन. २७/२०२५ भा.न्या.सं. कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (१) ३५१ (२), ३५२ प्रमाणे आरोपी विश्वास कोळी व शोभा कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद कंखरे करीत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम