ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

एरंडोल तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा...

ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

एरंडोल तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील नंदगाव रोडवर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ज्यात ट्रॅक्टरच्या धडकेत एक प्रौढ गंभीर जखमी होऊन नंतर उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला.

युवराज दामू सैंदाणे (५३), रा. नंदगाव, एरंडोल, असे मृतक प्रौढाचे नाव आहे. ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातमजुरी करत होते. ७ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवर एरंडोल येथून गावी परत जात होते. नंदगाव रस्त्यावर एका ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये युवराज सैंदाणे गंभीर जखमी झाले होते.

कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सात दिवस उपचार घेतल्यानंतर, १३ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृत्यूच्या घटनेची नोंद एरंडोल पोलीस स्टेशनला झाली असून, पुढील तपास सुरू आहे.

युवराज सैंदाणे यांच्या मृत्यूमुळे नंदगाव गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले आणि सुना असा परिवार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम