ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार; बुधवारी दुपारी १२ वाजता अधिकृत घोषणा

संजय राऊत यांच्या ट्विटमुळे चर्चांना पूर्णविराम; मुंबई महापालिकेसाठी जागावाटप जवळपास निश्चित
मुंबई : वृत्तसंस्था — शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर ठोस दिशा मिळाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील हालचाली वाढल्या असताना ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर खासदार संजय राऊत यांनी स्वतः ट्विट करत युतीच्या घोषणेची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करत ‘उद्या १२ वाजता’ असे सूचक कॅप्शन दिले आहे. या ट्विटमुळे बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संयुक्तपणे युतीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत बैठक झाली असून दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी युती आधीच झाली असून केवळ जागावाटपाची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सांगितले होते. वरळीतील डोममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले, तेव्हाच युती निश्चित झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानुसार एकूण २२७ प्रभागांपैकी १४५ ते १५० जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवण्याची शक्यता असून मनसेला ६५ ते ७० जागा मिळू शकतात. याशिवाय ठाकरे बंधूंना साथ देणाऱ्या शरद पवार गटासाठी १० ते १२ जागा राखीव ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे. आता बुधवारी होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार; बुधवारी दुपारी १२ वाजता अधिकृत घोषणा
संजय राऊत यांच्या ट्विटमुळे चर्चांना पूर्णविराम; मुंबई महापालिकेसाठी जागावाटप जवळपास निश्चित
मुंबई : वृत्तसंस्था — शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर ठोस दिशा मिळाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील हालचाली वाढल्या असताना ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर खासदार संजय राऊत यांनी स्वतः ट्विट करत युतीच्या घोषणेची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करत ‘उद्या १२ वाजता’ असे सूचक कॅप्शन दिले आहे. या ट्विटमुळे बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संयुक्तपणे युतीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत बैठक झाली असून दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी युती आधीच झाली असून केवळ जागावाटपाची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सांगितले होते. वरळीतील डोममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले, तेव्हाच युती निश्चित झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानुसार एकूण २२७ प्रभागांपैकी १४५ ते १५० जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवण्याची शक्यता असून मनसेला ६५ ते ७० जागा मिळू शकतात. याशिवाय ठाकरे बंधूंना साथ देणाऱ्या शरद पवार गटासाठी १० ते १२ जागा राखीव ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे. आता बुधवारी होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम