ठाणे व मुंबई येथे दोडे गुर्जर मंडळातर्डे आरोग्य शिबिराचे आयोजन

महिलांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

बातमी शेअर करा...

ठाणे व मुंबई येथे दोडे गुर्जर मंडळातर्डे आरोग्य शिबिराचे आयोजन

महिलांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

मुंबई / ठाणे प्रतिनिधी

दोडे गुर्जर मंडळ ठाणे व मुंबई येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला समाज बांधवांनी व भगिनींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला . या शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष सुनील चौधरी यानी केले.

या वेळी समाजातील सुप्रसिद्ध व निष्णात डॉ.योगेश पाटील , डॉ. मनोज पाटील, डॉ. दिपक पाटील, डॉ. प्रशांत जाधव, डॉ.करिश्मा पाटील, डॉ राखी जाधव, डॉ.राजश्री पाटील , डॉ. सीमा पाटील डॉ . नितीन पाटील, डॉ. अमिता पाटील, , डॉ. मोहिणी पाटील , डॉ. संदेश पाटील व ईशा नेत्रालयचे डॉक्टर उपस्थित होते. तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ.योगेश पाटील व डॉ.दिपक पाटील यांनी मधुमेह, रक्तदाब व हृदयविकाराशी संबंधित आजाराची कशी काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले.

तसेच डॉ.राखी जाधव यांनी स्त्रियांच्या आजारांविषयी मार्गदर्शन केले तर डॉ. मनोज पाटील यांनी दातांची काळजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले. मंडळाच्या वतीने सचिव जी.आर. अण्णा व ए.जी.आप्पा यांनी सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ २०० महिलानी सहभाग घेतला ,

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम