ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्याशिबिराचा ८०० रुग्णांनी घेतला लाभ

बातमी शेअर करा...

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्याशिबिराचा ८०० रुग्णांनी घेतला लाभ

स्वातंत्र्यवीर सावरकर नगरात आयोचजण

ठाणे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘एकनाथ हीरक ६० आरोग्य वर्ष’ निमित्त कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र १४ मध्ये एक दिवशीय आरोग्य महायज्ञेत सुमारे ८०० नागरिकांच्या विविध तपासणी करण्यात आल्या. यात ६० टक्के महिला तर ४० टक्के पुरूषांचा सहभाग होता. या तपासणीतून महिलांना अनियमीत मासीक पाळी आणि युरिन इन्फेक्शनचा त्रास प्रामुख्याने असल्याचे तर पुरूषांमध्ये मधुमेह उच्च रक्तदाबाची सर्वाधीक समस्या असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

‘एकनाथ हीरक ६० आरोग्य वर्ष’ आरोग्य महायज्ञ २०२५ या उपक्रमाचा शुभारंभ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र १४ मध्ये आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य महायज्ञ २०२५ ने करण्यात आला. शिवसेना गटनेते, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. उद्घाटन प्रसंगी शिवसेना मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे, ठाणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितील, डॉ. वर्षा सासणे,डॉ. शिरीष टिंगरे, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. शिंदे , डॉ. शिरीष टिंगरे, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. शिंदे संकल्प विद्यालयाचे राज परब, समाजसेवक माणिक पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे मोफत उपचार, मोफत औषध वाटप, स्त्रीरोग, बालरोग, हाडांचे विकार,सामान्य तपासणी, किडनी स्टोन, कार्डिओलॉजिस्ट सल्ला,हृदयरोग उपचार आणि गरज असल्यास ‘टूडी इको’ हृदयरोग शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी सिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये मोफत होणार तसेच यावेळी ठामपा आरोग्य विभागा तर्फे ४० वर्षा वरील ७९ महिलांची मेमोग्राफी (ब्रेस्ट कॅन्सर) तपासणी करण्यात आली,३६ जणांचे इसीजी काढले,५० नागरिकांची मशीनवर शुगर आणि बीपी तपासणी केली,डिग्नीटी फाऊंडेशनतर्फे २१४ ज्येष्ठ नागरिकांची फिजिओथेरपी करण्यात आली रोटरी क्लब ऑफ भांडुपतर्फे २०० जणांचे मोफत मोतिबिंदू तपासणी करण्यात आली, त्यात २५ जणांना मोफत शस्त्रक्रिया होणार तर ४७ जणांना आयुषमान कार्ड मोफत वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम