
डांभुर्णी येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या चौघांवर कारवाई
तालुक्यातील डांभुर्णी येथील बसस्थानकावर यावल पोलिसांच्या पथकाने कारवाई करत तब्बल १०५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करुन चौघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला.
डांभुर्णी येथील बसस्थानक परिसरात गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती यावलचे पो. नि. प्रदिप ठाकूर यांना मिळाली होती. त्यांनी सहायक फौजदार वसंत बेलदार, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदे शी, योगेश खोंडे, सचिन पाटील, हितेश बागुल यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. या पथकाने डांभुर्णीतील
बसस्थानक परिसरात करवाई केली. तेथे गणेश बळीराम बोरसे याच्याकडून २५ लिटर गावठी दारू, बाळू गोपाळ सोनवणे याच्याकडून ३० लिटर गावठी दारू, नितीन सुरेश कोळी याच्याकडून ३० लिटर गावठी दारू व प्रल्हाद रूपा भिल याच्याकडून ३० लिटर गावठी दारू, अशा चौघांकडून तब्बल १०५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी चौघांविरूध्द यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ-हे. तपास पो.नि. प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनात हवालदार संदिप सूर्यवंशी करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम