डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापर करतांना मूल्यांची कास सोडू नये

ब्रह्माकुमारीज् शिक्षण प्रभागातर्फे शिक्षण संमेलन

बातमी शेअर करा...

डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापर करतांना मूल्यांची कास सोडू नये.
डिजिटल युगात मूल्यशिक्षणासमोरील आव्हाने संमेलनातील आशावाद
ब्रह्माकुमारीज् शिक्षण प्रभागातर्फे शिक्षण संमेलन

जळगाव : (प्रतिनिधी) डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतांना मूल्यांशी फारकत होत आहे हे वास्तव जरी असले तरी मूल्यशिक्षणासाठी सर्व घटकांनी संगठीत प्रयत्न केल्यास या आव्हानास आपण सहज परतवू शकू असा आशावाद राष्ट्रीय शिक्षण परीषदेत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला.

इंटरनेट, स्मार्ट फोन, कृतिम बुद्धीमत्ता, सोशल मीडियाच्या या डिजिटल युगात मूल्यशिक्षण समोरील आव्हानांवर दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन ब्रह्माकुमारीज् शिक्षण प्रभाग, जळगाव आणि लेवा एज्युकेशन युनियन संचलित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्माकुमारीज् दिव्य प्रकाश सरोवर, सावखेडा येथे करण्यात आलेले आहे.

▪️उदघाटन :

संमेलनाचे उदघाटन, बीके रितू ठक्कर, मिनाक्षीदीदी, प्राचार्या गौरी राणे, डॉ. सोमनाथ वडनेरे, धीरज सोनी, मिलन भामरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दोन दिवसीय संमेलनात बीके डॉ. वैष्णवी खैरनार, हेमलतादीदी, वर्षादीदी, प्रा. अविनाश कुमावत, राजदीदी, यांनी केले. बीके तेजल, बीके दिपशिखा यांनी मंचसंचलन केले.

▪️ डिजिटलचा नियंत्रीत वापरासाठी त्रिसूत्री : सिस्टर बीके रितू ठक्कर

तंत्रज्ञानाचा योग्य वापर समाज प्रगतीस आवश्य आहे, लहान मुलांच्या हातात आलेला स्मार्ट फोन, शालेय अभ्यासक्रमापासून उच्च शिक्षणापर्यंत होणारा डिजिटलचा वापर पाहता स्वनियंत्रण, स्वनियमन आणि स्व अनुशासन या त्रिसूत्रीचा वापरच मूल्यशिक्षणाचा प्रभावी वापरासाठी आवश्यक आहे असल्याचे मत सिस्टर बीके रितू ठक्कर, सुप्रसिद्ध लाईफ कोच प्रशिक्षक आणि समूपदेशक मुंबई यांनी व्यक्त केले.

मूल्यशिक्षणासाठी परिवाराची महत्वाची भूमिका : प्राचार्या डॉ. गौरी राणे

परिवार हा मूलांची पहिली शाळा असल्याने पालकांनी व परिवारातील घटकांनी डिजिटलचा योग्य वापराकडे लक्ष द्यावे आणि स्वत:च नियंत्रीत आणि योग्य वापर केल्यास मूल्यशिक्षण पाल्यांमध्ये देणे शक्य होईल असे प्रतिपादन बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांनी केले.

▪️ कृतिम बुद्धिमता बरोबर आध्यात्मिक बुद्धीमत्ता समन्वय : डॉ. सोमनाथ वडनेरे

सर्व क्षेत्रातील वाढत्या कृतिम बुद्धीमत्तेचा वापरासाठी आध्यात्मिक बुद्धीमत्तेचा वापर प्रत्येक क्षेत्रात केल्यास निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन संमेलन समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम