डीजेच्या वाहनाच्या धडकेत रोहीत्राचे नुकसान

बातमी शेअर करा...

डीजेच्या वाहनाच्या धडकेत रोहीत्राचे नुकसान

फुले मार्केट समोरील घटना

जळगाव : डिजेच्या वाहनाच्या धडकेत फुले मार्केटसमोरील विद्युत रोहीत्राला धडक लागून त्यातून ऑईल गळती झाली. त्यामुळे रोहीत्राला आग लागून नुकसान झाल्याची घटना दि. ५ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी डिजेच्या वाहन चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील फुले मार्केटकडून टॉवरचौकाकडे जात असलेल्या डि. जे. वाहनाने विद्युत पोलवरील डीटीसी या रोहीत्राला जोरदार धडक दिली. या अपघातात डीटीसी रोहीत्र फुटून त्यातून ऑईल गळती होवून आग लागली. त्याची माहिती मिळताच एमएसईबीचे सहाय्यक अभियंता हर्षल पाटील, महेंद्र पाटील, विजय जाधव, गणेश सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. त्यानंतर शहर पोलीसात तक्रार दिली असुन त्यानुसार डीजेच्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम