
डॉक्टरला मारहाण : चौघांविरुद्ध गुन्हा
डॉक्टरला मारहाण : चौघांविरुद्ध गुन्हा
नंदुरबार : रुग्णालय आवारात दुचाकी बाजूला लावण्यास सांगितल्याच्या रागातून चौघांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात घडली.
वैद्यकीय अधिकारी पंकज हरी खर्डे यांनी मुख्य गेटजवळ उभी असलेली दुचाकी दूर लावण्यास सांगितले असता गोरख लक्ष्मण नाईक, रोहित मधुकर चौधरी, विष्णू चौधरी (त्रि. रा. तोरणमाळ) आणि आणखी एका व्यक्तीने दारूच्या नशेत त्यांना मारहाण केली. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम