डॉ. अनिकेत पाटील एमसीएच न्युरोसर्जरी उत्तीर्ण

बातमी शेअर करा...

डॉ. अनिकेत पाटील एमसीएच न्युरोसर्जरी उत्तीर्ण
जळगाव- येथील गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांचे सुपुत्र डॉ. अनिकेत पाटील यांनी एमसीएच न्युरोसर्जरी ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत उच्च पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे वैद्यकीय क्षेत्रात नव्या पिढीचे न्युरोसर्जन तयार झाले आहे.
डॉ. अनिकेत पाटील यांनी पुण्याच्या काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि जनरल सर्जरीमध्ये एम एस तर मुंबईच्या डॉ. डि.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून अत्युच्च अशी न्युरोसर्जरीसाठी एमसीएच ही पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली आहे. अत्यंत मेहनत, चिकाटी आणि समर्पणाच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले आहे. आई-वडीलांचा वैद्यकीय वारसा त्यांनी पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. अनिकेत लवकरच न्युरोसर्जन म्हणून रुग्णसेवेसाठी आपली सेवा सुरू करणार आहेत. त्यांच्या कार्यामुळे मेंदू व मेरुदंडासंबंधी आजारांनी त्रस्त रुग्णांना नवजीवन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य आणि संवेदनशीलतेच्या आधारे ते रुग्णसेवेला एक नवा आयाम देतील. या यशस्वी वाटचालीबद्दल गोदावरी फाउंडेशनतर्फे श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाष पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अक्षता पाटील यांच्यासह गोदावरी परिवारात त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम