
डॉ. आयुषी उर्विश पटेलचे पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत यश
डॉ. आयुषी उर्विश पटेलचे पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत यश
जळगाव, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथील एमपीटीएच (पहिले वर्ष) शिक्षण घेत असलेल्या डॉ. आयुषी उर्विश पटेल (पीटी) हिने राष्ट्रीय स्पर्धेत व्दीतीय क्रमांक प्राप्त करीत यश मिळवले आहे. नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या कम्युनिटी फिजिओथेरपी या विभागातील पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. ही ३ रीं आयएपीडब्ल्यूसी कॉन्फरन्स आणि फिजिओ मंथन या राष्ट्रीय परिषद १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. या परिषदेत देशभरातील फिजिओथेरपी क्षेत्रातील विद्यार्थी व तज्ज्ञ सहभागी झाले होते. डॉ. आयुषी यांनी सादर केलेल्या संशोधनात्मक विषयाला परीक्षकांनी पसंती देत दुसरा क्रमांक घोषीत केला. तिला मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. तिच्या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील आणि प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांचेसह शिक्षकांनी आनंद व्यक्त करीत अभिनंदन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम