
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळात सायबरवर मार्गदर्शन
विदयार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळात सायबरवर मार्गदर्शन
विदयार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन
भुसावळ — येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुलच्या विदयार्थ्यांनी आज सायबर सुरक्षतेचे धडे घेतले.
यावेळी पीएसआय मंगेश जाधव हे उपस्थीत होते. या सत्रात विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षितता डिजिटल जबाबदारी आणि सायबर सुरक्षेतील सर्वोत्तम पद्धतीबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी आणि मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विदयार्थ्यांना जागरूक राहण्याचे व काळजीपुर्वक सोशल मिडीया हाताळण्यासाठी आवाहन केले.प्रारंभी पीएसआय मंगेश जाधव यांचे प्राचार्य अनघा पाटील यांनी स्वागत केले. यावेळी बोलतांना अनघा पाटील यांनी सायबर सुरक्षतेबाबत जनजागृती आवश्यक असून विदयार्थ्यांनी देखिल शक्यतो सोशल मिडीयापासून लांब राहावे असे आवाहन केले. यशस्वीतेसाठी शिक्षक िंशक्षकेतर कर्मचारी वृदांनी परिश्रम घेतले.
महात्मा फुले जयंती अभिवादन
आद्य समाज सुधारक व शिक्षण तज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमीत्त आज अभिवादन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनघा पाटील मॅडम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला पुष्प माळा अर्पण करून दीप प्रज्वलन केले. या दिनानिमित्त शिक्षण सामाजिक न्याय आणि महिला सशक्तिकरण यातील त्यांच्या योगदानावर चिंतन करून महात्मा ज्योतिबा फुले यांचा जिवनचरीत्र समजावून सांगण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम